मालवणचे पप्पा बाणावलीकर यांचे निधन…

2

मालवण, ता. ३१ : माजी नगरसेवक आणि मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध क्षुधा शांती निवास या हाॅटेलचे मालक गुरुनाथ ऊर्फ पप्पा जयवंत बाणावलीकर (वय-८२) यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी निधन झाले.

मालवण पालिकेत बरीच वर्षे नगरसेवक पद भूषविणारे श्री. बाणावलीकर यांनी काही काळ उपनगराध्यक्ष पदही भूषविले होते. मालवणच्या भंडारी हायस्कुलचे ते माजी विद्यार्थी होत. कबड्डीपटू म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ मधील प्रसिध्द डॉ. निलेश बाणावलीकर यांचे ते वडिल होत. साप्ताहिक आघाडीचे संपादक नंदकिशोर महाजन यांचे ते सासरे होत.

4

4