होडावडा उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका दळवी बिनविरोध…

2

वेंगुर्ला,ता.०१: तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रसिका रविंद्र केळुसकर यांनी २८ एप्रिल रोजी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्यानंतर सरपंच अदिती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया आज सोमवारी पार पडली. यावेळी राधिका राजन दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक नरेश येडगे, ग्रा.प.सदस्य अनन्या धावडे, उत्तम धुरी, सुरेखा परब, रसिका केळुसकर आदी उपस्थित होते. राधिका दळवी यांची निवड जाहीर होताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, माजी सरपंच राजबा सावंत, अर्जुन दळवी, अंकुश जाधव, राजन दळवी, शामसुंदर दळवी, शाखाप्रमुख उदय दळवी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

1

4