“मी ऑफिसर होणारच!” जिल्हास्तरीय स्पर्धेत आयुष नाळे द्वितीय…

2

वैभववाडी,ता.०१:  डॉट कॉम्स असोसिएशन, कुडाळ मार्फत आयोजित ” मी ऑफिसर होणारच !” स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी कु.आयुष नाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
कु.आयुषला मुख्याध्यापिका सुप्रिया शेटये,प्रफुल्ल जाधव,अमोल येणगे,प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
आयुषच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे,विस्तार अधिकारी निसार नदाफ,केंद्रप्रमुख शिवाजी पवार,शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.सर्व स्तरातून आयुषचे कौतुक होत आहे.

3

4