सावंतवाडीत “रॅपिड टेस्ट” मध्ये आज मिळाले ६ कोरोना पॉझिटिव्ह…

2

सावंतवाडी ता.०१: शहरात घेण्यात आलेल्या “रॅपिड टेस्ट” मध्ये ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान सकाळपासून तब्बल ७० जणांची ही तपासणी करण्यात आली.समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुप्रिया धाकोरकर व त्यांच्या पथकाने ही तपासणी केली.पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे.

शहरात गेले चार दिवस ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांसह व्यापारी व सर्दी ताप संशयित रुग्णांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.या तपासणीत प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहेत.मात्र तपासणी पेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे प्रशासनाला सुद्धा दिलासा मिळत आहे.

17

4