सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचा पाणी जनरेटर आणि रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी…

2

वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटीलांचा दावा ; गळक्या छप्पराची दुरूस्ती करण्याचे आव्हान…

सावंतवाडी,ता.०१: येथील कुटीर रुग्णालयातील पाण्याचा जनरटेर आणि रुग्णवाहिका हे तिन्ही मोठ्या समस्या दुर करण्यास यश आले आहे.आता मात्र जुन्या इमारतीला असलेली गळती काढण्याचे आव्हान आहे,असे मत सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या धर्तीवर श्री.पाटील यांना शासनाकडुन पुन्हा एकदा एक वर्षाची मुदत वाढवून दिली आहे.आज पासून ही मुदत सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर श्री.पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले,सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाण्याच्या जनरेटरचा मोठा प्रश्न होता,तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेला निधी प्राप्त झाल्यामुळे प्रश्न सुटला आहे.दोन दिवसापुर्वी या ठिकाणी आधुनिक सेवा असलेली रुग्णवाहिका आली आहे.त्यामुळे तोही प्रश्न सुटला आहे.मात्र जुन्या इमारतीचे छप्पर हे जुन्या बनावटीचे असल्यामुळे त्यातील काही भागाला पत्रे घालण्यात आले आहे.तर उर्वरीत भाग हा उताराचा असल्यामुळे त्या ठिकाणी पत्र्यावर कौले राहू शकत नाही,असे बांधकाम अभियंत्याचे म्हणणे आहे.त्यामुळे तो प्रश्न कसा दूर करता येवू शकतो याबाबत आमचा विचार सुरू आहे,असे श्री.पाटील म्हणाले.

3

4