राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील आणि पार्थ यांचे सुयश…

2

बांदा ता.०१: अष्टपैलू संस्कृती-कला अकादमी,मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते दुसरी या गटात सावंतवाडीच्या पार्थ उमेश सावंत याने प्रथम,तर तिसरी ते चौथी या गटात बांदा येथील नील नितीन बांदेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मिळून एकुण १९५ स्पर्धक सहभागी झाले होते.या यशाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

2

4