जिल्हा बँकेची एक रक्कमी कर्ज परतफेड योजना”१ जुलैपासून बंद…

2

सतीश सावंतांची माहिती;सद्यस्थितीत ३० जून पर्यंत मुदतवाढ…

सिंधुदुर्गनगरी,ता.०१: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून थकित कर्ज वसुलीसाठी राबविण्यात येणारी “समोपचार एक रक्कमी कर्ज परतफेड योजना” १ जुलै २०२१ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभासद, शेती- बिगर शेती संस्थांकडे तसेच शाखांकडे वैयक्तिक थेट अनुत्पादित (एन पी ए ) थकीत कर्ज खात्याच्या कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून “सामोपचार एकरक्कमी कर्ज परतफेड योजना” (वन टाइम सेटलमेंट) राबवली जात आहे. सुरू असलेल्या या योजनेला सद्यस्थितीत ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही योजना १ जुलै २०२१ पासून बंद करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे बँकेचे जुने थकित कर्ज खातेदार आहेत व ज्यांना बँकेच्या सामोपचार एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हायचे आहे, त्यांनी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

6

4