कायम “पॉझिटिव्ह” असलेला सावंतवाडीतील “राजाराम”…

2

कोरोना काळात जीवावर उदार होऊन सेवा; तहसीलदार म्हात्रेंचा वेगळा आदर्श…

सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता .०१: कोरोनाच्या काळात “पॉझिटिव्ह” हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांची “गुगली” उडते.मात्र सर्वसामान्य नव्हे, तर कोरोनाच्या रुग्णांना सुध्दा “मी” कोविड सेंंटरमध्ये जावून भेटतो.त्यामुळे “मी कायमच पॉझिटिव्ह असतो…!”,असे मिश्किल पणे सांंगून आपल्या जिवापलीकडे कुंटुबाप्रमाणे सावंतवाडीकरांची सेवा करणारे एक अवलिया नेतृत्व म्हणून सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांचे नाव घेता येईल.संस्थान काळात बापुसाहेब महाराजांचे सावंतवाडीत संस्थानातील काम पाहून खुद्द महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थान आणि बापुसाहेब महाराजांबद्दल “रामराजा” असा उल्लेख केला होता.मात्र या रामराज्यात कोरोनाच्या काळात हा “आधुनिक राजाराम” सावंतवाडीकरांसाठी खरा दुवा ठरला आहे.अशा या अनोख्या व्यक्तींचा पन्नासावा वाढदिवस आज होत आहे.याच पार्श्वभूमीवर ब्रेकिंग मालवणीकडून घेण्यात आलेला त्यांच्या कार्याचा धावता आढावा.
सावंतवाडी तहसिलदार म्हणून गेेेले तीन वर्षे तालुक्यात श्री.म्हात्रे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत.या काळात त्यांनी अनेकांची रेंगाळलेली कामे करुन दिली.तसेच प्रसंगी खिशात हात घालून अनेकांना मदतही केली.दरम्यान कोरोना काळात त्यांच्याकडुन झालेले काम हे तर युवाईला सुद्धा लाजविणारे होते.कोरोना काय ?,कसा होतो ?,माणूस कसा मरतो ?,असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना सुध्दा श्री.म्हात्रे यांनी थेट फील्डवर जावून काम केले.
कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून अनेक परप्रांतीय कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी त्यांनी मदत केली.अनेकांना जेवणाचे साहीत्य उपलब्ध करून दिले.त्यासाठी प्रसंगी आपल्या खिशात हात घातला, अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींची मदत घेतली.या सर्व परिस्थितीनंतर यावर्षीच्या कोरोना काळात त्या पलीकडे जावून त्यांंनी काम केले.बांदा पंचक्रोशीत मृत झालेल्या एका व्यक्तीला कोणच अग्नी देण्यास तयार नव्हता,अशा वेळी त्यांनी स्वतः पुढे येवून त्यांना अग्नी दिला.तर सावंतवाडीत कॉरन्टाईन असलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांचे मन परिवर्तन करण्यास त्यांनी यश मिळविले.विशेष म्हणजे या सर्व जोखमीच्या काळात सुध्दा एक क्लासवन ऑफीसर असताना सुध्दा श्री.म्हात्रे हे सावंतवाडी शहरात असलेल्या कोविड सेंटरला एक दिवस आड करून भेट देतात.हा सर्व त्यांचा प्रंपच कामा पलीकडे आहे.आपण माणूसकी जपली पाहीजे,परमेश्वर कायम साथ देतो,असे सांगून ते आपल्या सोबत असलेल्यांना नेहमीच मानसिक बळ देतात.अशा या अनोख्या व्यक्तिमत्वाला ब्रेकिंग मालवणीकडुन खुप-खुप शुभेच्छा.

0

4