शेर्ले येथील तरुणाचा खोदलेल्या चरात पडून मृत्यू…

2

बांदा,ता.०१: शेर्ले भूतनाथ मंदिर जवळ खोदलेल्या पाईपलाईनच्या चरात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.परेश बाळकृष्ण मेस्त्री (वय ३५) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी संध्याकाळी परेश शेतात गेला असता पाय घसरुन तोल गेल्याने चरात पडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.आज सकाळी शोधाशोध केली असता परेशचा मृतदेह चरातील पाईपलाईनमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ,पुतण्या असा परिवार आहे.

2

4