“त्या” अश्लील व्हिडिओशी संबंधितांवर गुन्हे दाखल करा…

2

परशुराम उपरकर यांची मागणी; पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता.०१: सावंतवाडी तालुक्यातील एका आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या “त्या” अश्लील व्हिडिओची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.दरम्यान “त्या” व्हिडिओत दिसणाऱ्या संबंधित महिला व पुरुषासह त्याचे चित्रीकरण करून व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,संबंधित कृत्य हे सावंतवाडीसह जिल्ह्याच्या संस्कृतीला अशोभनीय आहे,असे असताना देखील जाणून-बुजून ही चित्रफित तयार केल्याचे दिसून येत आहे.व्हिडिओ मधील संवादावरून संबंधित आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच “तो” व्हिडिओ चित्रित करण्यास चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला परवानगी दिल्याचे समजते,तसेच असे अनेक व्हिडिओ तयार केले असल्याचे त्यांच्या गावातील काही व्यक्तींचे म्हणणे आहे,मात्र ते संबंधितांचेच आहेत का ?,याचीही सखोल चौकशी करावी,व जिल्ह्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या “त्या” व्हिडिओशी संबंधित सर्वांची महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली आहे.

16

4