दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे पुण्यातील दोघे ताब्यात…

2

बांदा,ता.०१: गोव्यातून पुणे येथे बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघांना आज बांदा येथे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेला बोलेरो आणी दारूसह तब्बल १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बांदा पोलिसांनी बांदा टोल नाका येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास केली.

विलास प्रल्हाद राखपसरे (वय ३६) व भावेश गबा पाटील (वय ३८) (दोघेही रा. औंध ता. हवेली, जिल्हा पुणे) अशी त्यांची नावे आहेत. कोविड तपासणीसाठी सीमा नाक्यावर लावलेल्या तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

1

4