शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना १० टक्के ऑक्सीजन बेड प्राधान्याने उपलब्ध करून द्या…

2

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना;विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता.०१: कोविड -१९ शी लढा देणाऱ्या शासकीय कर्मचारी,अधिकारी यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त १० टक्के खाटा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात.शासन निर्देशानुसार कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मर्यादीत उपस्थिती ठेवावी.यासह विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड १९ चा प्रार्दुभाव विचारात घेता सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये असून मृत्यू दर देखील जास्त आहे .अशावेळी शासनाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित ठेवावी. कोविड योद्धा महसूल कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या साठी रुग्णालयांमधील ऑक्सिजनयुक्त १० टक्के खाटा प्राधान्याने उपलब्ध होण्यासाठी आरक्षित ठेवाव्यात. अभ्यंगताना कार्यालय मध्ये प्रवेश देत असताना अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त अन्य अभ्यागतांना कार्यालयांमध्ये प्रवेशास बंदी करावी. तसेच अतिमहत्वाच्या कामा करिता येणाऱ्या अभ्यागतांना आर टी पी सी आर टेस्ट निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करावे. तसेच अभ्यंग ताना प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. महसूल कर्मचारी यांना कोरोना काळामध्ये वेगवेगळ्या पथकांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या असून हे कर्मचारी बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याने व घरातील वयोवृद्ध व लहान मुलांच्या संपर्कात येत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याकरिता महसूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने आगामी १५ दिवसांमध्ये करण्यात यावे. यासाठी आपल्याकडून सूचना देण्यात याव्यात. अशा मागण्या या निवेदनातून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

यावेळी कर्मचा-यांच्‍या समस्‍यांकडे प्राधान्‍याने लक्ष देणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी आश्‍वासन दिले. तर यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्‍या वतीने नागरिकांना अत्‍यंत महत्‍वाच्‍या कामाकरिताच कार्यालयामध्‍ये यावे, तसेच स्‍वत:ची काळजी घ्यावी. असे संघटनेच्‍या वतीने आवाहन करण्यात आले .

यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे सत्‍यवान माळवे, अशोक पोळ, स्‍वप्निल प्रभु, शाम लाखे, दिपक परब आदी पदाधिकारी हजर होते.

3

4