इन्सुली तपासणी नाक्यावर दारूसह तब्बल ८० लाखाचा मुद्देमाल जप्त…

2

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; मध्यप्रदेशातील चौघांवर गुन्हा दाखल….

बांदा ता.०१: गोव्यातून थेट मध्यप्रदेशकडे वाहतूक करण्यात येणारी तब्बल ७२ लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे पकडली आहे.याप्रकरणी मध्यप्रदेशच्या चौघा संशयितांना अटक करण्यात आली.या कारवाईत आठ लाखाचा ट्रकसह तब्बल ऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे यांनी दिली.
रोशन ओमप्रकाश पाल,ओमप्रकाश पाल दोघे राहणार इंदौर,दिलीप कमल रावत, रुपेश पंढरी सेन दोघे रा.मध्यप्रदेश अशी या चौघा संशयितांची नावे आहेत.ही कारवाई रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्या समोर करण्यात आली.यासाठी सहकारी अधिकारी शैलेश चव्हाण, रमेश चंदुरे, संदीप कदम, शरद साळुंखे आदींनी सहकार्य केले.

3

4