सावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्यांना दणका…

2

पोलिसांची कारवाई; तब्बल ४० जणांकडून साडे नऊ हजारांचा दंड वसूल…

सावंतवाडी ता.०१: शहरात विनाकारण फिरणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्या तब्बल ४० जणांना आज पोलिसांनी दणका दिला.यात संबंधितांकडून ९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वाहतूक पोलिस प्रवीण सापळे आणि सुनील नाईक यांच्या पथकाने केली.
या कारवाईत विनाकारण फिरल्या प्रकरणी ३२ ,तर मास्क न वापरल्या प्रकरणी ८ मिळून ४० जणांना पोलिसांनी दंड केला.

1

4