माजी नगरसेवक उमेश वाळकेंचे उद्यापासून साखळी उपोषण…

2

कणकवली, ता. १ : बांधकामाला परवानगी मिळत नसल्‍याने उद्या (ता.२) पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडणार असल्‍याचा इशारा माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी दिला आहे. याबाबत त्‍यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

श्री.वाळके यांनी म्‍हटले की, शहरातील सर्वे नं.१५९ मधील हिस्सा नंबर ७१ आणि ९६ या मिळकतीमध्ये बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतीकडे १७ ऑगस्ट २०१८ रीतसर अर्ज केला होता. मात्र अद्यापपर्यंत या बांधकामाला नगरपंचायतीने परवानगी दिलेली नाही. त्‍यामुळे बांधकामाला परवानगी मिळेपर्यंत आपल्‍या मुलासमवेत साखळी उपोषण करणार अाहे.
वाळके यांनी उपोषण इशाऱ्याचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसह तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनाही दिले आहे.

7

4