घरात घुसून महिलेला मारहाण करणाऱ्या “त्या” संशयितांवर कारवाई करा…

2

हेत येथील त्या पिडीत महिलेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन ; न्याय देण्याची मागणी…

वैभववाडी,ता.०१: घरात घुसून मारहाण करणाऱ्या त्या चौघा संशयितांवर कठोर कारवाई करा,या मागणीचे निवेदन हेत येथील पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. या प्रकरणात रोहित विलास कदम (वय २५) रा.मांगवली, आशिष सूर्वे (वय २५) रा.ओणी, अशोक खानविलकर (वय ५०), प्रवीण खानविलकर (वय २५) दोन्ही रा. हेत या चौघांनी घराच्या दरवाजावर लाथ मारून घरात घुसून माझ्या कुटुंबातील महिलांना मारहाण केली.
या घटनेची वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु संबधितावर पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संबंधित संशयितावर कडक कारवाई करण्यात यावी,असे त्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

1

4