कुडासे खुर्द येथे लवकरच कोविड कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करू;अनिषा दळवी…

2

दोडामार्ग,ता.०१: तालुक्यातील कुडासे खुर्द ग्रामपंचायतीला कोविड कक्ष उभारण्यासाठी जनसुविधा अंतर्गत सुशोभीकरण विकास निधी मंजूर झाला आहे.दरम्यान हा निधी तात्काळ मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मिळवून देण्याचा शब्द जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना दिला आहे. सौ. दळवी यांनी आज कुडासे खुर्द ग्रामपंचायतीला भेट दिली.
दोडामार्ग तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता शासनाने होम आयसोलेशन बंद करून गाव पातळीवर विलगिकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. त्याची जबाबदारी कृती समितीकडे सोपविण्यात आली आहे. कुडासे खुर्द सरपंच संगिता देसाई यांनी पाल पुनवर्सन शाळा ईमारत दुरुस्तीसाठी मंजूर असलेला निधी शाळेतील बाथरूम व संडास बांधण्यास निधी व अन्य दुरुस्ती साठी मिळावा असे पत्र दिले.ग्रामपंचयात सुशोभीकरणासाठी निधी मंजूर आहे त्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. तो लवकर मिळावा व जन सुविधा मधून स्मशानभूमी दुरूस्ती साठी मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावेळी सदस्य संदेश देसाई , सानवी दळवी , मयुरी पालव , पोलिस पाटील दाजी देसाई , आशासेविका
ऋणाली देसाई आदी उपस्थित होते.

5

4