राज्य उत्पादन शुल्कची बेकायदा दारू वाहतूकी विरोधात जोरदार मोहीम…

2

बांदा
इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात आज जोरदार मोहीम उघडली. विशेष म्हणजे एका दिवसात सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सकाळी ८० लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना ताजी असताना सायंकाळी तब्बल ४५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे दारू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. दोन्ही कारवाया   जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. आज दिवसभरात तब्बल सव्वाकोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवसभरातील कारवाईचा हा उच्चांक आहे.गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ३४ लाख ६६ हजार ५६० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू, ११ लाख रुपये किमतीचा टेम्पो व इतर मुद्देमाल १० हजार रुपये असा एकूण ४५ लाख ७६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अधीक्षक श्री. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, राजा पाडळकर, विशेष पथकाचे दुय्यम निरीक्षक ए. एम. चव्हाण, रमेश चांदुरे, शरद साळुंखे यांच्या पथकाने केली.

0

4