सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या कणकवली,शिरोडा,दोडामार्ग बसफेऱ्या उद्यापासून सुरू…

2

आगार व्यवस्थापकांची माहिती; प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करुन सेवेचा लाभ घ्यावा…

सावंतवाडी ता.०२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सावंतवाडी ते कणकवली,शिरोडा आणि दोडामार्ग या बसफेऱ्या उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेतअशी माहिती आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी दिली.दरम्यान कोरोना रोगप्रतिबंध नियमांचे पालन करून ही सेवा दिली जाईल,त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा सहकार्य करावे,असे आवाहन श्री.पडोळे यांनी केले आहे.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,उद्या ता.३ जून पासून सावंतवाडी आगारातून कोरोना नियमांचे पालन करून काही बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.दरम्यान सर्व प्रवाश्यानी याचा लाभ घ्यावा.सुरू होणाऱ्या फेऱ्यांमध्ये सावंतवाडी – कणकवली :- ०७:००, ०८:१५, ०९:००,११:३०,१५:००,१६:००,सावंतवाडी – शिरोडा :- ०८:००, १२:३०, १७:००.,सावंतवाडी – दोडामार्ग :- ०७:१५, ०९:००, १२:३०,१७:००. आदींचा समावेश आहे.

19

4