सावंतवाडीत स्थानिकांना डावलून मिटर रिडींगचा कोल्हापूरात ठेका…

2

कामगारांसह भाजप-मनसे आक्रमक;त्या ठेकेदाराला सावंतवाडीत येऊ न देण्याचा इशारा…

सावंतवाडी,ता.०२: येथील वीज वितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीवर मिटर रिडींगचे काम करणाऱ्या कामगाराचा ठेका गुपचुपपणे एका कोल्हापूर येथील ठेकेदाराला दिला असल्याचा आरोप आज येथील भाजप व मनसे पदाधिकाऱ्यांनी उघड केला.यावेळी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे स्थानिक कामगारांचे म्हणणे आहे. दरम्यान चुकीच्या पद्धतीने ठेका दिला जात असेल तर त्या ठेकेदाराला सावंतवाडीत येऊ देणार नाही,असा इशारा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आला.
यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या महिला कामगारांनी अधिकारी व ठेकेदाराच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.गेली तेरा हून अधिक वर्षे आम्ही काम करत आहोत, कोरोनाच्या काळात आम्ही प्रामाणिकपणे सेवा बजावली,असे असताना आम्हाला डावलले गेल्यास आम्ही आंदोलन करू,असा इशारा महीलासह अन्य कामगारांनी दिला आहे.यावेळी यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार,अमित परब,मनसेचे परिवहन कामगार जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संजय पार्सेकर, अनुषा मुद्राळे, ज्ञानदा जाधव, आयना अल्मेडा, श्रुती सावंत, अरुणा मुद्राळे, रामदास भोगण, अमित माणगावकर, सतीश तोरस्कर, राजेंद्र देसाई, महादेव सावंत, सागर परब, विष्णू सावंंत, प्रथमेश सावंत, जनार्दन पार्सेकर, राजेंद्र राऊळ, रघुनाथ आळवे, प्रशांत गावडे आदी उपस्थित होते.

 

2

4