सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ४१३ जणांनी घेतला पहिला डोस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०२: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ४१३ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण ९ हजार ६८१ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ६ हजार ७६८ जणांनी दुसरा डोस घेतला. ८ हजार ८२६ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ४ हजार ५७५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील ७२ हजार १७७ व्यक्तींनी पहिला डोस तर २४ हजार ८१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ६२ हजार २७७ नागरिकांनी पहिला डोस तर ८ हजार ३९८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १२ हजार ४५२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण २ लाख ९ हजार २३५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण २ लाख २ हजार ७४० लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये १ लाख ५६ हजार ३८० लसी या कोविशिल्डच्या तर ४६ हजार ३६० लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर १ लाख ६३ हजार ९२८ कोविशिल्ड आणि ४५ हजार ३०७ कोवॅक्सिन असे मिळून २ लाख ९ हजार २३५ डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ४ हजार ३९० लसी उपलब्ध असून त्यापैकी २ हजार १६० कोविशिल्डच्या आणि २ हजार २३० कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या ८७० लसी शिल्लक असून त्यापैकी ७९०  कोविशिल्ड आणि  ८०  कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत.

1

4