म्हाडाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ५० बेडचे कोविड हॉस्पिटल..

2

अमित सामंतांची माहिती ; पंधरा दिवसात हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार…

सावंतवाडी, ता.०३: जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून ओरोस येथे म्हाडा अंतर्गत ५० बेडचे हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात हे हॉस्पिटल चालू करण्यात येणार आहे. त्यात व्हेंटीलेटर बेड ऑक्सिजन आणि आदी सुविधा असणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर बाळ कनयाळकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,शाफिक खान,शिवाजी घोगळे,सुनील भोगटे,रुपेश जाधव,दर्शना बाबर देसाई आदी उपस्थित होते.
श्री सामंत पुढे म्हणाले
ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला हे ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल असणार आहे.व्हेंटिलेटर,ऑक्‍सिजन व आयसीओ आदी सेवांसह उभारण्यात येणार आहे.याचा जिल्ह्यातील लोकांना फायदा होणार आहे.तसेच पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी हा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला होता.त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.या रुग्णालयातील सर्व वस्तू,बेड पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार आहे,त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेसाठी भविष्यात सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.असेही यावेळी श्री सामंत म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेसिक जिल्हा उपाध्यक्ष पदी शफीक खान यांची यावेळी निवड करण्यात आली आहे.

1

4