वेंगुर्ले तालुक्यातील पहिला “संस्थात्मक विलगीकरण कक्ष” कुशेवाडा येथे स्थापन… 

2

वेंगुर्ले,ता.०२: कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच गावपातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील पहिला “संस्थात्मक विलगीकरण कक्ष” कुशेवाडा येथे स्थापन करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कुशेवाडा कार्यक्षेत्रात कुशेवाडा रावदस शाळेमध्ये या पहिल्या विलगीकरण कक्षाची स्थापना आज २ जून रोजी करण्यात आली. १० बेड चा हा कक्ष ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सनियत्रंण समिती व लोकसहभागातुन स्थापन करण्यात आला आहे. यावेळी सरपंच सौ.स्नेहा उदय राऊळ, उपसरपंच श्री.निलेश दत्तात्रय सामंत, सदस्य श्री.सचिन दामोदर देसाई, सौ.राजश्री.राजाराम परब, सौ.सविता सदानंद तेली, सौ.स्नेहा नंदकुमार परुळेकर, श्री.दत्तगुरु गणेश केसरकर, श्री. निलेश दिगबंर परुळेकर, सौ.अनुजा अरुण माडये, सौ.रुपश्री रुपेश राणे, ग्रामसेवक श्री. आनंद प्रभाकर परुळेकर, तलाठी श्री.तुकाराम गायकवाड, आरोग्य सेवक श्री.संतोष बनसोडे, रुपेश राणे,आपा वडाणकर, महादेव सापळे, नारायण पार्सेकर, सच्चिदानंद गोसावी, गोविंद केसरकर, श्रीराम राऊळ व ग्रामस्थ उपस्थित होते. कोंविड सेंटर साठी लागणाऱ्या मुलभुत सोईसुविधा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंंचायत सनियंत्रण समितीचे सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्यातुन निर्माण करण्यात आलेले आहेत.

1

4