वेंगुर्ले-मठ गावात संशयित ८४ रुग्णांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट…

2

उपकेंद्रा अंतर्गत मोहीम; सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा…

वेंगुर्ले ता.०२: तालुक्यातील मठ उपकेंद्रा अंतर्गत गावातील तब्बल ८४ जणांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली.यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांसह सर्दी,खोकला,ताप अशा संशयित रुग्णांची ही तपासणी केली जात आहे.दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राखी कुडतरकर,आरोग्य सेवक मोहन धुरी आणि आरोग्य सेविका वर्षा गंगावणे यांच्या पथकाकडून ही मोहीम सुरू आहे.
२८ मे पासून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान आतापर्यंत ८४ जणांची तपासणी झाली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यासाठी संबंधितांच्या घरी जाऊन त्यांची टेस्ट करण्यात आली.दरम्यान या मोहिमेला ग्राम प्रशासनासह ग्रामस्थांचे सुद्धा चांगले सहकार्य मिळत आहे.तर या तपासणी पथकात आशा सेविका,अंगणवाडी सेविका व शिक्षकांचा समावेश आहे.

8

4