कणकवली-आचरा मार्गावर पावसातच डांबराची मलमपट्टी…

2

सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांचा दुर्लक्ष ; ये-जा करणाऱ्या वाहनचालकांबरोबर केला वाद…

कणकवली,ता.०२: येथील कणकवली-आचरा या राज्य महामार्ग रस्त्यावर पळसंब येथे २ जुनला डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराने हाती घेतले आहे. याठिकाणी काम करत असताना ये-जा करणाऱ्या वाहनांना देखील रोखत प्रवाशांना नाहक त्रास देण्याचा प्रकार देखील पुढे आला आहे.पावसात हा रस्ता करुन बांधकाम विभागाला काय साध्य करायचे आहे?,असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केला आहे.फक्त ठेकेदाराचे बिल काढण्यासाठीच हा खटाटोप चालला असून पावसात हा रस्ता पुरवता खराब होईल.कारण गेल्या काही दिवसात दररोज पाऊस पडत असल्यामुळे हा रस्ता करणं चुकीचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केला आहे.या बाबत सामाजिक कार्यकर्ते बी. डी.कांबळी,रत्नाकर राणे यांनी संताप व्यक केला.

1

4