कोविड उपचारांसाठी रुग्णांच्या होणाऱ्या लुटमारीला सरकारचा लगाम…

2

शहरांचे वर्गीकरण करत दर केले निश्चित; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती..

मुंबई ता.०२: कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये बिलांसाठी प्रचंड खर्च येत होता.याबाबत अनेक नागरिकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे.शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. या निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निर्देश देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी कोविड सेंटर मधील रुग्णांची लूट थांबणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा जिल्हा क वर्गवारीत येत असल्यामुळे वार्डमधील नियमित विलगीकरण प्रतिदिन २४०० रुपये, व्हेंटिलेटरवर व आय. सी. यु. आणि विलगीकरण ५४०० रुपये, केवळ आयसीयू व विलगीकरण ४५०० रुपये असा दर शासनाने जाहीर केला आहे. या दरांमध्ये आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या,औषध, बेड व जेवण खर्च असणार आहे. मात्र मोठ्या चाचण्या व तपासणी उच्च पातळीवरचे औषधे, कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे वेगळा राहणार आहे, असे सर असे जर महाराष्ट्र शासनाने जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक स्वरुपात व्हावी, मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

2

4