कोरोना रोखण्यासाठी डाॅ.रेडकरांनी सुचवलेली “मिथिलीन ब्ल्यू” मॅजिक थेरपी वापरा…

2

आमदार दीपक केसरकर यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

मालवण,ता.०२: कोरोनावर “मॅजिक थेरेपी” ठरणाऱ्या “मिथीलीन ब्ल्यू” या पद्धतीला कोरोना रूग्ण वाढत असलेल्या रेड झोन मधील जिल्ह्यात वापरण्यात यावे,अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित उपचार पद्धती बाबत चर्चा करण्यासाठी या थेरपीचे अभ्यासक असलेल्या डाॅ.विवेक रेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.ही पद्धती स्वस्त असून कमी वेळेत रुग्णाला आराम देणारी आहे.त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी श्री केसरकर यांनी केली आहे.

दरम्यान देशातील तीनशेहून अधिक हृदयरोग तज्ञांना या थेरपी बाबत चांगले आणि सकारात्मक निकाल आले आहेत. अनेक रुग्णांना ही थेरेपी चांगली वाटत आहे.त्यामुळे या थेरपीचा वापर जास्त कोरोना रूग्ण असलेल्या ठिकाणी करण्यात यावा,असे डाॅ. रेडकर यांचे म्हणणे आहे.त्यानुसार आमदार केसरकर यांनी याबाबत शासनाकडून योग्य ते विचार करण्यात यावा,अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

20

4