माजी नगरसेवक उमेश वाळकेंचे उपोषण स्थगित…

2

निर्णय न झाल्यास १६ जून पासून पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा…

कणकवली, ता.०२ : बांधकाम परवानगी साठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी आज साखळी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे हे उपोषण नकरण्याची विनंती पोलीस व न.पं.प्रशासनाकडून तसेच प्रांताधिकार्‍यांकडून करण्यात आली. या विनंतीला मान देत तूर्तास हे उपोषण थांबवत आहे. मात्र १६ जून बांधकाम परवानगी बाबत निर्णय न झाल्यास पुन्हा साखळी उपोषण छेडणार असल्याचे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी सांगितले.
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात वैशाली राजमाने, न.पं. चे मुख्याधिकारी अवधूत तावडे तसेच पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी उमेश वाळके, सोहम वाळके, न.प.चे नगररचनाकार मयूर शिंदे, पोलीस कर्मचारी मंगेश बावदाणे, कैलास इंपाळ आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत उमेश वाळके यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की,
शहरातील सर्वे नं.१५९ मधील हिस्सा नंबर ७१ आणि ९६ या मिळकतीमध्ये बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतीकडे १७ ऑगस्ट २०१८ रोजी रीतसर अर्ज केला होता. मात्र अद्यापपर्यंत या बांधकामाला नगरपंचायतीने परवानगी दिलेली नाही.असे सांगितले असता याबाबत नगरपंचायतीने योग्यती पडताळणी करून याबाबतचा निर्णय द्यावा. असे प्रांताधिकारी यांनी सांगितले. मात्र आज उपोषण स्थगित करत असलो तरी १६ जून पर्यंत कोणताही निर्णय नझाल्यास आपण पुन्हा साखळी उपोषण करणार असल्याचे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी सांगितले.

2

4