सावंतवाडी शहरातील एका ब्युटीपार्लरवर पालिकेकडून कारवाई…

2

कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन; १५ जून पर्यंत दुकान सील…

सावंतवाडी ता.०२: कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एका ब्युटीपार्लरवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान संबंधित दुकान गाळा १५ जून पर्यंत सील करण्यात आला आहे.ही कारवाई मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या आदेशानुसार पालिका पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून व ब्युटी पार्लर पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.मात्र या नियमांचे उल्लंघन करत संबंधित ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली.यात दुकान गाळा सील करण्यात आला आहे.

5

4