अल्पवयीन मुलीला मातृत्व लादल्या प्रकरणी चिंदर येथील युवकाला अटक…

2

व्हाट्सअपवरून ओळख करून केली फसवणूक; जिल्हा न्यायालयाकडून ५ दिवसाची पोलीस कोठडी…

ओरोस ता.०२: व्हाट्सअपवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेवून अल्पवयीन मुलीला मातृत्व लादल्या प्रकरणी चिंदर येथील २४ वर्षीय युवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.हर्ष प्रभाकर खोत,असे त्या युवकाचे नाव आहे.आज त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की,चिंदर येथील हर्ष खोत या युवकाची एका १६ वर्षाच्या मुलीशी व्हाट्स अप वरुन डिसेंबर २०२० मध्ये ओळख झाली.या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यानंतर हर्ष याने तिला फिरायला जावूया का ?,अशी विचारणा केली. त्यानुसार हे दोघे मालवण येथे फिरायला गेले.मालवण येथील हॉटेलमध्ये दोघांनी प्रेमाच्या आणाबाका घेतल्या.यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले.ही घटना १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत घडली आहे.असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

31

4