कणकवलीतील पांडुरंग काणेकर यांचे निधन

2

कणकवली, ता. ०२ : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पन्नास वर्षाहून अधिक काळ काम केलेले, गांधीवादी विचारसरणीचे कणकवली येथील पांडुरंग उर्फ भाईसाहेब धोंडू काणेकर ( ८३ ) यांचे आज निधन झाले आहे. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सहवासात त्यांनी गोपुरी आश्रमात एक तप काम केले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी केलेला खादीचा अंगीकार शेवटपर्यंत कायम ठेवला. जिल्हा खरेदी विक्री संघात त्यांनी व्यवस्थापक म्हणून तीस वर्षे काम केले. त्यांच्या पश्चात महेश, अभय, प्रशांत असे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साहित्यिक, कवी महेश काणेकर यांचे ते वडील होत.

2

4