सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा…

2

सुनील घाडीगावकर यांच्या वतीने कोविड सेंटर आरोग्यविषयक साहित्याचे वाटप…

मालवण, ता. २ :  पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी आज आपला वाढदिवस मालवणात सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटर येथे सॅनिटाईझर, मास्क, वाफेची मशीन व फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुनील घाडीगावकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी पाटील, भाजपा नेते दत्ता सामंत, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, प्रशांत बिरमोळे, नंदू आंगणे, समीर सावंत, बबन परब, प्रकाश कासले, शैलेश लुडबे यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यात कोरोना रुग्णासंख्या वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. दत्ता सामंत यांचेही सहकार्य आरोग्य विभागास वेळोवेळी मिळत आहे.
मात्र ऑक्सिजनची वाढती गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. याचा विचार करता ताप, सर्दी आदी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ टेस्ट करून घ्यावी. दुखणे अंगावर काढू नये. कोरोनाचे निदान लवकर झाल्यास उपचार वेळेत मिळून रुग्ण लवकर बरा होतो अन्यथा गंभीर स्थिती निर्माण होते, असे चित्र आहे. तरी नागरिकांनी लक्षणे दिसल्यास लगेचच टेस्ट करा. असे आवाहनही श्री. घाडीगावकर यांनी मालवणवासीयांना केले.

3

4