मोरे येथील स्वप्ननगरीची खासदार विनायक राऊत यांच्याकडून पाहणी….

2

कुडाळ,ता.०२: मोरे येथील स्वप्ननगरी अपंग पुनर्वसन मदत केंद्रातील तब्बल बावीस जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी आज त्याठिकाणी भेट घेतली.
संबधितांवर उपचार करण्यासाठी संबंधित केंद्र हे सीसीसी सेंटर म्हणून जाहीर केले.
यावेळी आमदार वैभव नाईक,यावेळी जि.प.सदस्य राजू कविटकर,कृष्णा धुरी,राम धुरी,परब, व स्वप्ननगरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.मोरे स्वप्ननगरी येथे स्वतःजाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.माणगाव खोऱ्यातील प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील यांच्याकडून रुग्णांची औषध उपचाराचा आढावा घेतला.कोविड रुग्णांवर उपचारासाठी स्वप्ननगरी सीसीसी सेंटर म्हणून करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी बाबत सूचना देण्यात आल्या,तसेच रुग्णांच्या सेवेसाठी ६ नर्सची नेमणूक करण्यात आली आहे.पीपीई किट,मास्क, ऑक्सिजन, सॅनिटायझर तसेच इतर साहित्य मागवण्यात आले आहे.

3

4