वैभववाडी शहरात १४४ जणांची कोरोना टेस्ट; चार जण आढळले पॉझिटिव्ह…

2

वैभववाडी,ता.०२: शहरात विनाकारण फिरणा-यांची रॕपिड व आरटीपीसीआरच्या तब्बल १४४ टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये ४ कोरोना पाॕझिटीव्ह आढळले आहे. त्यांची रवानगी सांगुळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. यामुळे शहरात विनाकारण फिरणा-यांना चांगलाच चाप बसणार आहे.
शहरात मध्यवर्ती ठिकाणी व मच्छी मार्केट या दोन ठिकाणी आरोग्य विभागाने कोरोना तपासणी पथक तैनात केली. सोबत रुग्णवाहीकाही ठेवण्यात आली होती. दरम्यान आरोग्य पथकांनी खाजगी डाॕक्टरांच्या दवाखान्यात आलेल्या रुग्णांची तपासणी केली. त्यात तीन रुग्ण कोरोना पाॕझिटीव्ह आढळले आहेत. आरोग्य पथकामध्ये सेविका निलम कदम, व जांभवडेकर, स्वप्निल वरवडेकर त्यांच्यासमवेत नगरपंचायतीचे कर्मचारी, पोलिस होमगार्ड आदी मदतीला होते.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे व कर्मचारी पथकासमवेत होते. वैभववाडी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलिस राजू जामसंडेकर, मारुती साखरे, श्री.पवार, होमगार्ड शहरात गस्त घालत विनाकारण फिरणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

6

4