गावागावात विलगीकरण कक्ष सक्षम करा…

2

तहसीलदार रामदास झळके; करूळ येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ…

वैभववाडी,ता.०२: कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन अथक मेहनत घेत आहे. गावागावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सनियंत्रण समितीला संस्था, मंडळे यांनी मदत केली पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सक्षम करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन तहसीलदार रामदास झळके यांनी केले.
करूळ येथील आरोग्य उपकेंद्र अंतर्गत लसीकरण केंद्राचा शुभारंभ विद्यामंदिर भोयडेवाडी या प्रशालेत तहसीलदार झळके व पं.स. उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण, सह्याद्री जीवरक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, करूळ समाज सेवा संघ अध्यक्ष संतोष सावंत, शरद सावंत, सूर्यकांत माळकर, ग्रा.पं. सदस्य संध्या गुरव, दीपा पाटील, अनिता सुतार, मंडळ अधिकारी दीपक पावसकर, ग्रामसेवक शशिकांत गुरव, तलाठी सोनु सावंत, माजी नगरसेवक संताजी रावराणे, संतोष पाटील, बाळा पाटील, सीएचओ अतिफा चोचे, आरोग्य सेविका डी.एस. देसाई, अनिता कदम, आरोग्य सहाय्यक श्री. एकावडे, आरोग्य सेवक एस. एस. लोखंडे, आशाताई जान्हवी पांचाळ, नम्रता वळंजू, दीक्षा पवार, श्रद्धा सावंत, जगदीश पांचाळ, प्रदीप कदम, रत्नकांत राशिवटे, जयश्री जांभळे व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लसीकरण शुभारंभ प्रसंगी ४५ वर्षावरील एकूण ६५ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. गावात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

3

4