माजी नगरसेविका सुलभा बाणावलीकर यांचे निधन…

2

मालवण, ता. ०३ : मालवणच्या माजी नगरसेविका सुलभा गुरुनाथ बाणावलीकर (वय-८१) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ येथील प्रसिद्ध डॉ. नीलेश बाणावलीकर यांची ती आई होय. साप्ताहिक आघाडीचे संपादक किशोर महाजन यांची ती सासू होय. दोनच दिवसांपूर्वी पप्पा बाणावलीकर यांचे निधन झाले होते. पती पाठोपाठ काल पत्नीचेही निधन झाल्याने बाणावलीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

11

4