पुढचे चाक सुटल्याने इन्सुली येथे बोलेरो अपघातग्रस्त…

2

बांदा,ता.०३: मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाक्यासमोर भरधाव वेगात बोलेरो कारचे पुढचे चाक अचानक सुटून कार अपघातग्रस्त झाली. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्यावर शिताफीने थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
आज सकाळी सावंतवाडीहुन बांद्याच्या दिशेने जाणारी बोलेरो कार इन्सुली पोलीस चेकनाक्यावर आली असता अचानक पुढील चाकाचे नटबोल्ट भरधाव वेगात निघाल्याने चाक सुटुन तब्बल २० ते २५ फुट लांब जावुन पडले. सुदैवाने चालकाने गाडी उभी केल्याने समोर असलेला दुचाकी स्वार बचावला. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

8

4