कणकवली तहसीलमध्ये फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवेश…

2

तहसीलदार आर. जे. पवार यांची माहिती…

कणकवली, ता.०३:  तहसीलदार कार्यालयात फक्त अत्यावश्यक कामासाठीच प्रवेश दिला जाणार आहे. तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी आज दिली.
श्री.पवार म्हणाले, सेतू केंद्र तसेच व इतरही विविध कार्यालय यातील कर्मचारी यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन पर्यंत हे तहसील कार्यालय बंद असणार आहे. अति अत्यावश्यक जर काम असेल तर त्यांची आर टी पी सी आर टेस्ट झालेली असेल तर त्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनेही या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक येणाऱ्या नागरिकास त्याची आर टी पी सी आर टेस्ट झाली आहे काय व अति अत्यावश्यक काम आहे काय याची विचार करूनच त्याला आत मध्ये सोडण्यात येत आहे.

1

4