कुडाळातील नवीन ऑक्सीजन प्लांटचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

2

कुडाळ ता.०३: यूनाइटेड एअर गॅस प्रा.लि.कंपनीच्या माध्यमातून येथील एमआयडीसीत नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्या ४ जूनला सायंकाळी ४ वा.होणार आहे. याबाबत खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एमआयडीसी येथे भेट देऊन प्लांटची पाहणी केली.

जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने ऑक्सीजन तुटवडा भासू नये याकरिता पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, यांच्या प्रयत्नातून सदर कंपनीने कुडाळ एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारणी अवघ्या पंधरा दिवसात केली. ऑक्सीजन प्लांट ६ हजार लिटर ऑक्सीजन साठा क्षमता आहे.
त्यावेळी डॉ निलेश बनावलीकर ,कंपनीचे संचालक नलावडे, जि. प. गटनेते नागेंद्र परब प्रांताधिकारी वंदना खरमाळे, उपस्थित होते.

9

4