कुडाळ-महिला बालरुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये “सिटीस्कॅन” ची सुविधा उपलब्ध करा…

2

प्रसाद शिरसाट; स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी…

कुडाळ ता.०३: येथील महिला बाल रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सिटीस्कॅन मशिनची सुविधा उपलब्ध करून द्या,अशी मागणी येथील सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वसामान्यांना प्रायव्हेट सिटीस्कॅनचे दर परवडणारे नाही,त्यामुळे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून शासन दरबारी पाठपुरावा करावा,असेही त्यांनी यावेळी म्हटले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिली आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी शासन दरबारी सुद्धा चांगले प्रयत्न सुरू आहेत अलीकडच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुद्धा वेगाने सक्षम केला जात आहेत.याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात सुरु करण्यात आले आहे।त्यात उत्तम दर्जाची सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे.मात्र उपचारापूर्वी कोरोना तपासणीसाठी रुग्णांना सीटीस्कॅन करावे लागत आहे.आणि खाजगी सिटीस्कॅनचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत.त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये इतर सुविधा प्रमाणेच सिटीस्कॅनची सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्या,असे म्हटले आहे.

2

4