पोपटराव पवार करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना मार्गदर्शन…

2

कणकवली,ता.०३: सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार जिल्ह्यातील सरपंचांना मार्गदर्शन करणार आहे,अशी माहिती भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी दिली. झुम अॅपच्या माध्यमातून पाच तारखेला शनिवारी ही मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.श्री पवार यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या निश्चितच कमी करण्यासाठी मदत होणार आहे.तसेच सरपंच-उपसरपंच आणि सदस्यांना गावात काय उपाययोजना करता येईल,याबाबत मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री नितेश राणे यांनी केले आहे.

0

4