सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ८९६ जणांनी घेतला पहिला डोस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ८९६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण ९ हजार ६८९ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ६ हजार ७७६ जणांनी दुसरा डोस घेतला. ८ हजार ९२० फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ४ हजार ५९९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील ७३ हजार ३४६ व्यक्तींनी पहिला डोस तर २४ हजार ४१६ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ६३ हजार ४८९ नागरिकांनी पहिला डोस तर ८ हजार ६२० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १२ हजार ४५२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण २ लाख १० हजार ३०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 2 हजार 740 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 56 हजार 380 लसी या कोविशिल्डच्या तर 46 हजार 360 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 64 हजार 375 कोविशिल्ड आणि 45 हजार 932 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 10 हजार 307 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 2 हजार 820 लसी उपलब्ध असून त्यापैकी 1 हजार 760 कोविशिल्डच्या आणि 1 हजार 60 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 930 लसी शिल्लक असून त्यापैकी 790  कोविशिल्ड आणि  140  कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत.

2

4