राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला स्थानिक उत्पादनची बाजारपेठ विकसित करा…

2

सुरेश प्रभू; नितीन गडकरींकडे मागणी,मुंबई-गोवा महामार्गाचा समावेश…

सावंतवाडी.ता.०३: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला स्थानिक उत्पादनांची बाजारपेठ विकसित करण्यात यावी,अशी मागणी माजी मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे अल्फान्सो समुद्रकिनारी आणि इतर पर्यटकांच्या आकर्षणासाठी परिचित आहे. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या जिल्ह्यांना भेटी देतात,त्यामुळे जिल्ह्यामध्ये स्थानिक फळे व फुले तसेच शेती व कृषि प्रक्रिया केलेल्या उत्पादनाच्या व्यापारास प्रोत्साहन दिल्यास त्याचा फायदा येथील स्थानिक लोकांना होणार आहे.त्यामुळे त्यावर सकारात्मक विचार करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

2

4