भाजपाच्या कोविड सेंटरसाठी तात्काळ जागा द्या

2

राजन तेली ; जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली,ता.०३: जिल्ह्यात भाजपाकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता,सद्यस्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे .जिल्ह्यात ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे.या निवेदनात श्री तेली म्हटले आहे की,तौक्ते चक्रीवादळानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सिंधुदुर्ग दौरादरम्यान झालेल्या बैठकीत कोरोंना स्थितीचा आढावा घेत असता असे लक्षात आले की,ग्रामीण भागात कोविड सेंटरची आवश्यकता आहे.त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधान सभा निहाय ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे.यासाठी आपल्या मार्फत शासकीय व मंगल कार्यालयाच्या जागा आपल्या मार्फत उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले होते.तसेच त्यासाठी लागणारे वैद्यकीय सहकार्य म्हणजेच डॉ.परिचारिका तसेच सरकारी दवाखाने यांचे सहकार्य देण्याचे आपण मान्य केले होते.तरी कोविड सेंटरसाठी लागणारी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी.त्याच प्रमाणे जिल्ह्यातील वाढती कोरोंना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता सद्य स्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान ५०० बेडचे कोविड सेंटर उभारावे त्यातील निम्मे म्हणजे २५० बेड हे ऑक्सीजन बेड असतील असे पहावे.भारतीय जनता पार्टी यासाठी आपल्या परीने मदत करेल.तरी वरील दोन्ही बाबींवर तातडीने कार्यवाही, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.

2

4