४५ वर्षावरील नागरिकांचे उद्यापासून लसीकरण ; १४ हजार ६५० लसी उपलब्ध…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: ४५ वर्षावरील नागरिकांचे कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या ४ जून पासून आयोजित करण्यात आले आहे.या लसीकरण सत्रासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण १४ हजार ६५० कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये ४५ वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. फ्रंट लाईन वर्करचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात येणार नाही. फ्रंट लाईन वर्कर्सना फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आली अशून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.

3

4