दुचाकीवरून दारू वाहतूक केल्याप्रकरणी बेळगावातील एकाला अटक..

2

बांदा पोलिसांची कारवाई; दारूसह ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा ता.०३:बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी बेळगाव येथील एका दुचाकी चालकाला आज ताब्यात घेतले.त्याच्याकडून २४ हजार ४४० रुपये दारूसह २० हजाराची दुचाकी,असा मिळून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई आज करण्यात आली.राहुल बसप्पा बायले (२४),,असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरु होती दरम्यान केए 22डब्ल्यू 5200 हि दुचाकी आली. येथील उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय कामत व  कॉन्स्टेबल धनंजय गोळे यांनी बॉक्स दिसल्याने तपासणीसाठी उभी केली असता त्यात गोवा बनवटीची दारू असल्याचे उघड झाले.याबाबतची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय कामत यांनी दिली.

2

4