ब्ल्यू मिथिलीनच्या वापराबाबत शासनाने पावले उचलावीत…

2

रविकिरण तोरसकर ; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा…

मालवण, ता. ०३ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंधदुुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी व कोरोना पश्‍चात गुंतागुंत कमी करण्यासाठी मिथीलीन ब्ल्यू हे प्रभावी औषध म्हणून पुढे आले आहे. सरकारच्या कोरोना औषधोपचार उपचार प्रद्धतीत या औषधाचा समावेश होणे महत्त्वाचे बनले आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून या औषधाच्या वापराबाबत आवश्यक ती पावले उचलावीत अन्यथा याबाबत जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा नीलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच आज जिल्हा रेड झोनमध्ये आहे. विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व संस्था यांच्याकडून उपचार पद्धतीबाबत संशोधन व प्रयोग होत आहेत. यातील एक उपचार पद्धती म्हणून ’मिथीलिन ब्ल्यू’ या औषधाचा वापर कोरोना रोखण्यासाठी तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत कमी करण्यासाठी प्रभावी औषध म्हणून पुढे आले आहे. हे औषध अतिशय माफक दरात व पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. हे औषध विविध रुग्णालयात उपचार पद्धतीमध्ये वापरले जात आहे. परंतु कोरोनाचा समाजात होणार प्रसार थांबण्यासाठी ’मिथीलिन ब्ल्यू’ हे औषध सरकारच्या कोरोना औषधोपचार उपचार पद्धतीमध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा व नागरिकांपर्यत हे औषध पोहचू शकेल.
’मिथीलिन ब्ल्यू’ हे औषध कोरोना प्रतिबंधात्मक, कोरोना बाधीत रुग्णांना तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत टाळण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये न्यायचा असेल तर शासनाच्या औषधोपचार उपचार पद्धतीमध्ये याचा समावेश होणे आवश्यक आहे. औषध कंपन्याचे सरकारच्या सार्वजनिक आरोग्य धोरणात असलेले अर्थपूर्ण हस्तक्षेप बघता कोणतेही दडपण न घेता ही माफक दरात उपलब्ध असलेली मिथीलीन ब्ल्यू उपचार पद्धतीबाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीची पाऊले उचलावीत अन्यथा जन जागरण करून जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा श्री. तोरसकर यांनी दिला आहे.
मिथीलिन ब्ल्यू अत्यावश्यक औषध किंमत नियंत्रण कायद्याखाली आणावे, जेणेकरून औषण कंपन्यांना प्रमाणाबाहेर नफेखोरी करून सर्वसामान्य रुग्णांची लुबाडणूक होऊ नये. येत्या दोन दिवसात मिथीलिन ब्ल्यू टास्क फोर्स सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी विविध सामाजीक संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजीक कार्यकर्ते तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणे तज्ज्ञ यांच्याशी चर्चा सुरू आहे. तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून शासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत असेही श्री. तोरसकर यांनी म्हटले आहे.

0

4