कणकवली तालुक्यात आज ११४ कोरोना पॉझिटिव्ह कासार्डे गावात आढळले ३६ रुग्ण

2

कणकवली, ता.३ : ​ कणकवली तालुक्यात आज कोरोनाची उचांकी रुग्णसंख्या आली असून कणकवली तालुका हा जिल्ह्यात कोरोना च्या हिटलिस्टवर आला आहे. कणकवली तालुक्यात आज ११४ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, कणकवली शहर १६, कासार्डे मध्ये तब्बल ३६, तरळे १, आयनल १, सातरल २, कलमठ ६, करंजे १, कसवण १, दारिस्ते १, ओटव ४, कोळोशी २, तरंदळे ६, हरकुळ बुद्रुक २, नाटळ ४, वरवडे ५, फणसनगर ७, कासरल ५, बिडवाडी १, खारेपाटण २, शिडवणे १, सांगवे १, फोंडा ३, शिवडाव ६ असे एकूण ११४ पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात सापडले. तर कणकवली शहरातील दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

5

4