सिंधुदुर्गात व्हेंटिलेटर व ऑक्सीजन वरील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तज्ञ २५ डॉक्टरांची टीम तयार करा…

2

नंदन वेंगुर्लेकर; सर्व रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची मोहीम सुरू करा…

वेंगुर्ले ता.०४:  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत ऑक्सिजन बेडवर असणारे ३६६ रुग्ण व व्हेंटिलेटर बेड वर असणारे ५४ रूग्ण मृत्युमुखी पडू नये,यासाठी जिल्ह्यातील विशेष/तज्ञ २५ डॉक्टरांची टीम तयार करून सर्व रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची मोहीम सुरू करावी तसेच अन्य उपाय योजना तात्काळ सुरू केल्या तरच पुढील एक महिन्यात संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो, असे ठाम मत आधार फाउंडेशन, सिंधुदुर्ग चे सचिव श्री. नंदन वेंगुर्लेकर व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील लोकांचे कोरोना पासून जीव वाचवायचे असतील तर 1500 ऑक्सिजन बेड व 400 व्हेंटिलेटर बेड ची तात्काळ गरज आहे ?
शासनाने जिल्ह्यातील सर्व 431 ग्रामपंचायतीना प्रत्येकी 15 लाखाचा अतिरिक्त कोविड निधी तात्काळ वर्ग करावा अन्यथा सर्व CCC एक महिन्याच्या आतच निधी अभावी बंद करावे लागतील अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील CCC/DCHC/DCH मधील शिल्लक 464 बेड नक्की कोणासाठी राखीव ठेवले आहेत याचा खुलासा जिल्हा प्रशासन कधी देणार.
जिल्हा प्रशासनाने मागील 16 महिन्यात दर्जेदार व पूरक आरोग्य सोयी सुविधा जिल्हातील कोविड रुग्णांना न दिल्यामुळे 713 मृत झाले, त्या दगावलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे. तसेच जिल्हा रुग्णालयातील सरकारी सेवेत असलेले दोन्ही फिजिशियन सध्या कामावर रुजू नसल्यामुळे आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर यांच्या मार्फत इतर जिल्ह्यातील 5 एमबीबीएस, फिजीशियन डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करावी, 12 ड्युरो ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा रुग्णालय येथे आल्यानंतर शिल्लक राहिलेले अतिरिक्त जंबो सिलेंडर गरजेप्रमाणे जिल्ह्यातील इतर CCC/DCHC/DCH यांना तातडीने उपलब्ध केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतील यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, जिल्ह्यातील 57 प्रायव्हेट रुग्णवाहिका शासनाने ताब्यात घेऊन जास्त संख्या असलेल्या गावांमध्ये त्यांची नियुक्ती करून ग्राम नियंत्रण समितीकडे वर्ग करावी तसेच त्या सर्व रुग्णवाहिकेची बिले कोविड निधी मधून देण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी लसीकरण तसेच रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व PHC, SUB CENTAR, RH, SDH, DH मधील क्लास वन ते क्लास फोर च्या सर्व 600 पेक्षा जास्त रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने पुढील दोन वर्षासाठी समान काम समान वेतन या तत्वानुसार तातडीने भराव्यात. आणि जिल्ह्यातील सर्व प्रायव्हेट लॅब मध्ये रॅपिड तपासणी करण्याची अधिकृत परवानगी पुढील 6 महिन्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने द्यावी.
याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्याचा विशेष टास्क फोर्स स्थापन करून वेळोवेळी त्यांनी सुचविलेल्या महत्वाच्या बाबींवर फोकस करून आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी.वरील प्रमाणे सर्व गोष्टी केल्या तरच आपला जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होऊ शकतो असे श्री वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

1

4