पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिका अन्य ठिकाणी नेण्याचा प्रयत्न…

2

मनसेच्या प्रसाद गावडेंचा आरोप; तात्काळ निर्णय न बदलल्यास आंदोलन करण्याचा इशारा…

कुडाळ,ता.०४: पणदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेली रुग्णवाहिका तालुक्याच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न राजकीय पदाधिकार्‍यांकडुन सुरू आहे. मात्र काही झाले तरी आम्ही हा प्रयत्न यशस्वी होणार नाही,असा इशारा कुडाळ मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
याबाबत लोकांची मागणी लक्षात घेता हा निर्णय तात्काळ बदलण्यात यावा, अन्यथा पंचक्रोशीतील लोकांना घेवून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. सद्यस्थितीत पणदुर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका जीर्ण झाली आहे.त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका गरजेची आहे.

1

4